मुंबई

‘निसान’च्या ९,०४० वाहनांची नोव्हेंबरमध्ये विक्री

CD

‘निसान’च्या ९,०४० वाहनांची नोव्हेंबरमध्ये विक्री
देशांतर्गत बाजारपेठेत ओलांडला पाच लाखांचा टप्पा
गुरुग्राम, ता. ३ : ‘निसान मोटर’ने देशांतर्गत एकूण पाच लाख मोटर विक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून, कंपनीच्या भारतातील विक्रीस सुरुवात झाल्यापासून आजवर तब्बल ५,१३,२४१ वाहनांची विक्री झाल्याची माहिती ‘निसान मोटर, इंडिया’कडून देण्यात आली. सोबतच ‘न्यू निसान मॅग्नाइट एसयूव्ही’सह अन्य वाहनांच्या मागणीत वाढ होत असून कंपनीने नोव्हेंबरमध्ये एकूण ९,०४० वाहनांची घाऊक विक्री नोंदवली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री २,३४२ नोंदवली तर ६,६९८ वाहनांची निर्यात नोंदवण्यात आली आहे.


निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी या वेळी सांगितले की, निसान मोटर इंडियाने देशांतर्गत विक्रीचा पाच लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार करणे, ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या ग्राहकांनी वर्षानुवर्षे आमच्या वाहनांच्या दर्जा, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेवर सातत्याने विश्वास ठेवल्याचे या उल्लेखनीय यशातून दिसून येते. निसान भारतातील कार्यपद्धती, डिलर, भागीदार आणि ग्राहकांप्रति कटिबद्ध आहे. या वर्षीच्या सुरुवातीस निसान एक्स-ट्रेल आणि न्यू निसान मॅग्नाइट या दोन वाहनांच्या योजना आम्ही जाहीर केल्या होत्या. त्या योजना लवकरच प्रत्यक्षात येतील. ते पुढे म्हणाले की, निसानच्या भारतीय बाजारपेठेशी असलेल्या दृढ संबंधांचा एक भाग म्हणून ग्राहकांच्या अधिकाधिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही न्यू निसान मॅग्नाइट सादर करून आम्ही अलीकडेच आमच्या उत्पादनांचा विस्तार केला आहे. त्यामागे ‘वन कार, वन वर्ल्ड’ हे आमचे तत्त्वज्ञान आहे. न्यू निसान मॅग्नाइटच्या आगमनाने आमच्या निर्यातीत अभूतपूर्व वाढ झाली असून, आमच्या उत्पादन क्षमतेचे दर्शन त्यातून घडते. यामुळेच आम्ही जागतिक दर्जाची उत्पादने जगभरात पोहोचवू शकतो, असेही वत्स यांनी पुढे सांगितले.

..
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार व कौशल्याच्या संधी
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयपीएल) ही कंपनी २०१० मध्ये स्थापन झाली असून, ती निसान मोटर को. लि. जपानची १०० टक्के उपकंपनी आहे. ही कंपनी चेन्नईमधील उत्पादन प्रकल्प आणि संशोधन व विकास (आर अँड डी) केंद्रासह देशांतर्गत आणि देशाबाहेरील बाजारपेठांना सेवा देते. निसानने आपल्या जागतिक भादीदार असलेल्या रेनॉल्ट कंपनीशी ७०,००० पेक्षा अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार व कौशल्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय बाजारपेठेत १.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT