कासा, ता. ३ (बातमीदार)ः मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामामुळे तलासरी तालुक्यातील कोचाई गावातील बाधित शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही प्रकल्पाविरोधात आंदोलन केले. या वेळी मागण्या मान्य होईपर्यंत जमीन सोडण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण झाले आहे.
मुंबई-वडोदरा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, तसेच खानवेल सीमेलगत आहे. काही प्रकल्पबाधितांना मोबदला मिळाला नसल्याने त्यांच्याकडून या महामार्गाला विरोध होत आहे. तलासरी तालुक्यातील कोचाई गावात गेल्या दोन दिवसांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे या प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू आहे. जवळपास ६५ शेतकरी या प्रकल्पामुळे बाधित झाल्याने नुकसानभरपाई, घर, जमीन, झाडे आणि शेतीसाठी योग्य मोबदल्यावर शेतकरी ठाम आहेत, तसेच घरातील सामान, जनावरे, कुटुंबासह ठिय्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
----------------------------------------------
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
प्रशासनाने ४०० ते ५०० पोलिसांच्या बंदोबस्तात महामार्गाचे काम सुरू करण्याची प्रयत्न केला होता, मात्र शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पुन्हा काम बंद पाडले आहे, तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत महामार्गाचे काम रोखण्याचा इशारा दिला आहे.
------------------------------------------------
शासनाने दडपशाही केली तरीही महामार्गाचे काम आम्ही होऊ देणार नाही. शेतकऱ्यांची घरे, झाडे, तसेच जागेचे पैसे मिळावेत. दलालांनी चार भिंतीच्या आत सातबारे करून शासनाला फसवले आहे. त्यामुळे भूमिपुत्राचा त्यांच्या हक्काचा मोबदला मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
- भरत वायडा, सचिव, भूमिसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.