मुंबई

स्वामी समर्थांची पावले उमटल्याचा व्हिडीओ व्हायरल

CD

स्वामी समर्थांची पावले
उमटल्याचा व्हिडिओ व्हायरल
महिलेवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा
पनवेल, ता. ३ (वार्ताहर) : आपल्या घरी स्वामी समर्थांची पावले उमटल्याचा तसेच पोथीमधून अंगारा-विभूती निघत असल्याचा दावा करीत त्याबाबत व्हिडिओ समाज माध्यमांवर नुकताच व्हायल झाला होता. समाजात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या या महिलेविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही महिला पनवेल परिसरात वास्तव्यास आहे. नुकतेच २३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या घरी साक्षात स्वामी समर्थ आल्याचा आणि पोथीतून मोठ्या प्रमाणात अंगारा-विभूती निघत असल्याचा दावा त्या महिलेने केला. हा चमत्कार घडल्याचे दाखविण्यासाठी या महिलेने स्वामी समर्थांच्या पावलांचे ठसे आणि विभूतीचा ढीग दाखविणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यानंतर या महिलेच्या घरी दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती.
समाजात अंधश्रद्धा पसरविणारा कथित व्हिडिओ पनवेल येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. ती महिला चमत्कार झाल्याचे भासवून लोकांची दिशाभूल करीत असल्याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी महिलेविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
------
घरात स्वामी समर्थांची पावले उमटल्याचे तसेच पोथीतून विभूती निघत असल्याचा दावा करीत महिला लोकांची दिशाभूल करीत आहे. या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. महिलेने चमत्कार सिद्ध करून दाखवल्यास अंनिसकडून २१ लाखांचे बक्षीस देण्यात येईल.
- मनोहर तांडेल, अंनिस, पनवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT