महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६० रुपये दैनंदिन पास योजना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात दैनंदिन ६० रुपये शुल्क आकारून पास योजना उपलब्ध करून देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.
बेस्ट पास योजना तसेच बेस्टने पुरवलेल्या विविध योजनांबाबत माहिती देण्यासाठी शिवाजी पार्क, वीर कोतवाल उद्यान, प्लाझा या परिसरात बसवाहक आणि बस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. ४) मुंबईच्या विविध भागांतून चैत्यभूमीसाठी बसमार्ग क्रमांक २००, २४१, ए ३५१ आणि ३५४ या बस सोडण्यात आल्या आहेत. येत्या ६ डिसेंबरपासून शिवाजी पार्क दादर येथून बस मार्ग क्रमांक सी ३३, ए १६४, २४१, सी ३०५, ए ३५१, ३५४, ए ३५७, ए ३८५, सी ४४०, सी ५२१ या बस मार्गावर सोडण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार बस मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.