महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राची क्षमता वाढणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज केंद्राची सुमारे १,३२० मेगावाॅटने क्षमता वाढणार आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने या वीज केंद्रात ६६० मेगावाॅट क्षमतेचे दोन वीज संच उभारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या वीज केंद्राची एकूण वीजनिर्मिती क्षमता ३,५१० मेगावाॅटपर्यंत वाढू शकणार आहे. महानिर्मितीची सुमारे १० हजार मेगावाॅट एवढी औष्णिक वीजनिर्मिती क्षमता असून, त्यामध्ये कोराडी वीज केंद्राचा २,१९० मेगावाॅट एवढा हिस्सा आहे. दरम्यान, याआधी येथील २१० मेगावाॅट क्षमेतेचे वीज संच कालबाह्य झाल्याने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या वीज केंद्राची वीजनिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी महानिर्मितीने ६६० मेगावाॅट क्षमतेचे दोन वीज संच उभारण्याचा निर्णय घेत त्याबाबतचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठवला होता. त्यानुसार पर्यावरण विभागाने दोन्ही संचाच्या उभारणीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची वीजनिर्मिती क्षमता वाढणार आहे. त्यामुळे महावितरणला भविष्यात वीज मुबलक वीज उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.