मुंबई

डिजिटल अटकेच्या भीतीने गंडवले

CD

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर): वाशीतील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटक केल्याचे भासवत गंडवल्याचा प्रकार घडला आहे. तसेच बँक खात्यातील एक कोटी ८८ लाखांची रक्कम तपासणी करण्याच्या बहाण्याने लंपास केली आहे.
सायबर टोळीतील एका महिलेने ट्रायमधून बोलत असल्याचे भासवून वाशीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाशी संपर्क साधला होता. आधार कार्डवरून दोन मोबाइल फोन लिंक झाल्याने तसेच दुसऱ्या मोबाइलवरून अश्लील कॉल संदेश पाठवल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची भीती दाखवली तसेच त्यांना कुलाबा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी कॉल जोडून देण्यात येत असल्याचे भासवले. त्यानंतर दुसऱ्या महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याविरोधात ईडीने तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नागरिकाच्या विरोधात अटक वॉरंट निघाल्याचे बनावट पत्र पाठवताना सीबीआयकडून डिजिटल अटक केल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने याबाबतची माहिती कुणालाही दिली नाही.
-----------------------------------------------
वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी
सायबर टोळीने त्यांच्याकडील संपत्तीबाबत चौकशी करताना वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने जवळपास १ कोटी ८८ लाखांची फसवणूक करण्यात आली. पण आपली फसवणूक होत असल्याचा संशय ज्येष्ठ नागरिकाला आल्याने बाहेरगावी असलेल्या भावाला सर्व प्रकाराची माहिती दिली होती. त्यानंतर नातेवाइकाच्या मदतीने सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT