नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : संविधान हा सर्वांच्या मुक्तीचा मार्ग म्हणून स्वीकारणे आवश्यक असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे या देशातील सर्व रोगांवर सर्वोत्तम औषध आहे. यासाठी संविधान समर्पित जीवन मार्ग स्वीकारणे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन असल्याचे प्रतिपादन डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केले.
राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने खारघर येथील सुपारक भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. देशातील तमाम नागरिकांनी, कुटुंब प्रमुखांनी, जातीसंस्था, धर्मसंस्था, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी संविधानाच्या प्रति असलेले उत्तरदायित्व आणि त्याबाबत गेल्या ७५ वर्षांचा हिशेब दिला पाहिजे, असे स्पष्ट केले. तसेच, वंश, जात, धर्म, वर्ग, लिंग, भाषा, प्रांत, याला सर्वश्रेष्ठ मानून संविधानाची प्रतारणा हा देशद्रोह असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मुख्याधापक एम. एल. सूर्यवंशी, नेहा कपोते, सुजाता भोसळे, प्रमिला सनस, अंकुश कांबळे, आशा शिंदे, नवनाथ डोंगरगावकर यांनीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाला सिद्धार्थ मल्टीपर्पज रेसिडेन्शल हायस्कूल, अजिंठा इंटरनॅशनल हायस्कूल, डॉ. जी. के. डोंगरगावकर इंटरनॅशनल हायस्कूल, डॉ. नेल्सन मंडेला आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.