थकबाकीदारांची मालमत्ता जप्त
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : डोंबिवली पूर्वेला ग प्रभाग क्षेत्रात महापालिकेने बिगर निवासी मालमत्तांच्या थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईस सुरुवात केली आहे. वारंवार नोटिसा बजावूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. कर निर्धारण व संकलन विभागाच्या प्रमुख स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत व कर विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे आणि नरेश म्हात्रे यांच्या पथकाने काल दिवसभर ही मोहीम राबवली.
या कारवाईत डोंबिवली दत्तनगर येथील कमला सदन या मालमत्तेच्या मालकाची ३४ लाख ३९ हजार ७६७ रुपये थकबाकी आहे, यासाठी संबंधित इमारतीतील दोन दुकान गाळे बंद केले आहेत. तसेच, उर्सेकरवाडी येथील वीजप्रभा बिल्डिंग मालकाची पाच लाख ६६ हजार ६९७ रुपये थकबाकी असल्याने या इमारतीतील दोन दुकान गाळे बंद केले आहेत. थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा करावा, अन्यथा मालमत्तेवर कारवाई सुरूच राहील, अशी भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.