झोपडपट्टी भागात स्वच्छता मोहीम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : महापालिकेच्या माध्यमातून सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरतील रस्ते, पदपथ स्वच्छ करण्यात येत आहे. अशातच आता पालिकेने शहरातील प्रमुख रस्ते व त्याच्या आजूबाजूच्या परिसरासह झोपडपट्टी भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार आता शनिवारपासून महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचवावा, त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेंतर्गत शहरातल प्रमुख रस्ते, चौकांची स्वच्छता करण्यात येत होती; मात्र आता यासोबतच झोपडपट्टी भागातील स्वच्छतेवरदेखील भर देण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागात अधिक प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. तसेच, काही ठिकाणी तेथील रहिवासी मिळेल त्या जागी कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन त्याचा त्रास पुन्हा त्याच रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता या भागाकडे महापालिकेच्या घनकचरा विभागाने सफाई मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारपासून याला सुरुवात होणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे.
आता या भागातील रस्ते, शौचालये किंवा गटार, पायवाटा आदींची सफाई करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, कचऱ्याचे मुख्य स्पॉट असलेली ठिकाणेदेखील कचरामुक्त करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे. दरम्यान, यासंदर्भात उपायुक्त मनीष जोशी यांना विचारले असता, शहरातील प्रमुख रस्त्यांची व परिसराची साफसफाई केली जात होती. आता स्वच्छता मोहिमेअंतर्गत झोपडपट्टी भागातही स्वच्छता मोहीम राबिवली जाणार आहे. तसेच, येथील नागरिकांनादेखील स्वच्छतेविषयीचे महत्त्व पटवून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.