खारघर, ता. ७ (बातमीदार) : शास्त्रीय संगीत आणि भजन संगीताचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे हभप निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या वतीने सहस्रचंद्र दर्शन सोहळा पार पडला. या सोहळ्यात ५० किलो नाणी, मिठाई आणि सुका मेवा या साहित्यातून निवृत्तीबुवा यांची तुला करण्यात आली. बालयोगी सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. ठाणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणेशपुरी येथे झालेल्या या सोहळ्याला सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, कला अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. खारघरमधील रांजणपाडा गावातील नादब्रह्म साधना मंडळाचे संस्थापक हभप निवृत्तीबुवा चौधरी यांनी आपल्या आध्यात्मिक वाणीतून हजारो शिष्य घडविले. संगीत क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी ६० वर्षांपेक्षा जास्त काळ अविरतपणे काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.