मुंबई

धवला गीतांचा साज आजही हवाहवासा

CD

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : धवला गीतांचा सुमधुर आवाज ज्यावेळी कानी पडतो त्यावेळी एखाद्या घरात लग्नकार्य सुरू असल्याचे समजते. आगरी कोळी समाजातील धवला गीत गाणाऱ्या महिलेला पौरोहित्याचीदेखील दुहेरी भूमिका बजवावी लागते. सध्या उच्चशिक्षित महिला आवड म्हणून धवला गीत गाऊ लागल्याने समाजातील लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या गीतांना चांगले दिवस आले आहेत. ह्याच धवलगीतांतून आगरी समाजाने आपला सांस्कृतिक वारसा आजतागायत अभिमानाने जपला आहे. ही धवलागीते म्हणणाऱ्या महिलांना धवलारीण असे म्हटले जाते.
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने आगरी समाज वसलेला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या आगरी समाजाच्या पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या काही पारंपरिक लोकगीतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लग्नसोहळ्यात प्रामुख्याने गायली जाणारी धवला गाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. या गीतांशिवाय आगरी लग्नसोहळे अपुरे असल्याचे मानले जाते; मात्र गेल्या काही काळापासून या आगरी पट्ट्यात झपाट्याने वाढलेल्या शहरीकरणामुळे ही संस्कृती लुप्त होत चालली आहे. आगरी समाजातील लग्नसोहळ्यात गायली जाणारी धवला गाणी ही कोणत्याही लिखित स्वरूपात नसून केवळ मौखिक स्वरूपात आहेत. तसेच आगरी समाज राहत असलेल्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यामुळे येथील महिला कमीपणा वाटतो म्हणून पारंपरिक गाण्यांकडे पाठ फिरवत आहेत. मात्र धवला गाणी आपल्या संस्कृतीचा भाग असून, त्याद्वारे उत्पन्नाची संधीदेखील उपलब्ध होऊ शकते, अशी जनजागृती आगरी समाजातील ज्येष्ठ महिलांकडून करण्यात येत आहे.
----------
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित
धवलारीण पारंपरिक धवल्याच्या माध्यमातून लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते. लग्नसमारंभातील प्रत्येक विधीवर आधारित धवल्यातील गाणी धवलारीन अचूक क्रमाने गात असते. ही गाणी कुणी लिहली, कुणी रचली, केव्हा कोणाला सुचली हे निश्चित सांगता येत नसले तरी शब्दोल्लेख समजून घेतल्यास ही वर्षानुवर्षांपूर्वीची असल्याची दिसून येतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक रूपाने ही गीते हस्तांतरित होतात. लग्न सोहळ्यात या धवलारीण प्रसंगानुरूप धवले गातात.
-------------
विधवेला पौरोहित्याचा मान
हळदीच्या दिवशी मांडवात वडे, फेण्या, पापड्या तळताना धवलारीण गाणी गाते तिला धवला म्हणून बोलले जाते. आगरी कोळी समाजात धवलारीण ही लग्नाच्या मांडव स्थापनेपासून ते लग्नाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत पौरोहित्याची आपली भूमिका चोखपणे बजावते. विशेष म्हणजे इतर समाजात शुभ व मंगलकार्यात विधवांना नाकारले जाते; मात्र याउलट आगरी व कोळी समाजात विधवेला शुभ मानले जाते. धवलारीण विधवा जरी असली तरी तिला महिला पौरोहित्याचा मान दिला जातो व तिच्या हातून सर्व मंगल विधी पार पाडले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT