कपडे व माहिती पुस्तिका वाटप
धारावी, ता. ७ (बातमीदार) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायत, हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांकडून जमा झालेले चांगल्या स्थितीतील कपडे आणि महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील माहिती पुस्तिका वाटप करण्याचे काम केले. सायन रुग्णालयाच्या गेट नंबर सातसमोरील पदपथावर कपड्यांचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी आंबेडकर चौकात उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सामूहिक अभिवादन करून या कामाला सुरुवात केली. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक दिलीप गाडेकर, गिरीराज शेरखाने, अलका साबळे, सविता शेरखाने, अशोक काळे, शंकर गोपिडे आदींची उपस्थिती होती. धारावीतील मुकुंद नगर, लेबर कॅम्प, ट्रांझिस्ट कॅम्प, बसवेश्वर नगर आदी विभागांत अन्नदान, पाणी वाटप इत्यादी कार्यक्रम धारावीतील सामाजिक संघटनांनी राबवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.