मुंबई

लग्‍नात वऱ्हाडी बनून चोरी

CD

लग्‍नात वऱ्हाडी बनून चोरी
फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक
अंधेरी, ता. ७ (बातमीदार) ः बोरिवलीतील एका लग्नाच्या हॉलमध्ये वऱ्हाडी म्‍हणून प्रवेश करून नवविवाहित वर-वधूंना देण्यात आलेल्या मौल्यवान भेटवस्तू चोरी करणाऱ्या एका टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मानव नोजल सिसोदिया या २१ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी गुरुवारी (ता. ६) अटक केली. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
आरोपीच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उमेश नरेंद्र राय हे नालासोपारा येथे राहत असून, त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. बुधवारी (ता. ४) त्यांचा पुतण्या पराग याचा विवाह होता. त्यासाठी उमेश राय हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत बोरिवलीतील लग्नाच्या हॉलमध्ये आले होते. दिवसा लग्नविधी तर सायंकाळी रिसेप्शनचे आयोजन केले होते. रात्री साडेदहा वाजता नवविवाहित वर-वधूंचे फोटोशूट सुरू होते. तसेच लग्नात आलेले पाहुणे त्यांना भेटवस्तू देत होते. याचदरम्यान एक तरुण तिथे संशयास्पदरीत्या फिरताना फोटोग्राफरला दिसून आला.
काही वेळानंतर त्याने स्टेजवरील भेटवस्तू उचचली आणि तो तिथून निघू लागला. हा प्रकार संशयास्पद वाटताच फोटोग्राफरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून पळू लागला. या वेळी तिथे उपस्थित लोकांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सामानाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाहुण्यांकडून देण्यात आलेल्‍या काही भेटवस्तू सापडल्‍या. तो चोरीच्या उद्देशाने तिथे आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर हॉलच्या मॅनेजरने ही माहिती एमएचबी पोलिसांना दिली.
मानवला बोरिवलीतील स्‍थानिक न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लग्नांच्या कार्यक्रमात प्रवेश करून चोरी केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का, याचाबाबत पोलिस तपास करीत आहेत.


वधू-वरांना गिफ्ट देऊन करायचे रेकी
आरोपी मूळचा मध्य प्रदेशच्या राजगढ, कडिया गावचा रहिवासी आहे. विविध लग्नांच्या कार्यक्रमांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा मानव हा सदस्य असून, ही टोळी वऱ्हाडी म्हणून प्रवेश करून मौल्यवान भेटवस्तूंसह इतर ऐवज चोरी करते. कोणाला संशय येऊ नये, यासाठी ते वधू-वरांना गिफ्टदेखील देतात. त्यानंतर रेकी करून भेटवस्तू चोरी करून पलायन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT