मुंबई

अंबरनाथची तहान भागवणार

CD

आमदारांचा व्हिजननामा
अंबरनाथची तहान भागवणार

डॉ. बालाजी किणीकर
हेमलता वाडकर

विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारणारे डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ शहराची तहान सर्वप्रथम भागवण्याचा संकल्प केला आहे. अमृत योजनेंतर्गत अडीचशे कोटीहून अधिक निधी मिळवल्यानंतर या ‘संकल्पा’ला वेग येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. सुमारे १३ जलकुंभांची उभारणी केल्यानंतर पुढील ३० वर्षे टंचाई भासणार नाही, असा त्यांचा दावा आहे. याशिवाय संयुक्त घनकचरा प्रकल्प, विद्युतवाहिन्या भूमिगत करणे, हॉकर्स झोन ही कामे वेगाने मार्गी लावत शहरात स्मार्ट सिटी पार्क उभारण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतल्याचे त्यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीला सांगितले आहे.

२००९ मध्ये नव्याने अस्तित्वात आलेला अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. एससी समाजासाठी राखीव असालेल्या या मतदारसंघात सलग चार वेळा शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर निवडून आले आहेत. या आधीच्या आपल्या १५ वर्षांच्या कालखंडात त्यांनी मतदारसंघाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात येणारा हा मतदारसंघ असल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची साथ त्यांना वेळोवेळी मोलाची ठरली आहे. विशेष म्हणजे, खासदारांनी या मतदारसंघात अनेक विकासकामांना वाट मोकळी करून दिल्याने डॉ. किणीकर यांना एकप्रकारे ‘बूस्टर’ मिळाले आहे. त्या जोरावरच अंबरनाथ सध्या विकासाकडे झेप घेत आहे.

मुंबई, ठाणे, डोंबिवलीनंतर झपाट्याने मराठी भाषिकांचे हक्काचे ठिकाण अंबरनाथ बनले. गेल्या काही वर्षात येथे उभ्या राहिलेल्या इमारती, गृहसंकुलांमुळे झपाट्याने नागरीकरण होत लोकसंख्या वाढली आहे. जगप्रसिद्ध शंकर मंदिर आणि सर्वात मोठी एमआयडीसी अशी या शहराची वेगळी ओळख आहे; मात्र झपाट्याने लोकसंख्या वाढत असल्याने शहरात मूलभूत सोयी-सुविधा पुरवत असताना घनकचरा विल्हेवाट, पाणीप्रश्न आणि आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे आव्हानही उभे आहे. या सर्वांवर मात करण्यासाठी गेली १५ वर्षे आमदार डॉ. बालाजी किणीकर झटत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी जवळीक असल्याने त्यांनी अनेक विकासकामांचा शुभारंभ केला आहे. आता ही कामे वेळेत आणि वेगाने मार्गी लावण्याचा त्यांचा संकल्प आहे.

यामध्ये सर्वप्रथम प्राधान्य असेल ते पाणी नियोजनाचे. अंबरनाथ शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघाची टंचाई दूर करणे नव्हे, तर पुढील ३० वर्षे टंचाई भासू न देणे हा त्यांचा संकल्प आहे. यासाठी गेल्यावर्षी त्यांनी अमृत टप्पा दोनच्या माध्यमातून २५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. चिखलोली धरणाचे काम टप्प्यात असताना या निधीतून सुमारे १३ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा सुरळीत करून भविष्यात टंचाई भासणार नाही, असा त्यांचा दावा आहे.

दृष्टिपथातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प
- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
- सुभाष टेकडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुळता आता पूर्णाकृती होणार आहे. सुमारे नऊ फूट उंचीच्या या पुतळ्यासाठी डॉ. किणीकर यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. याशिवाय चिखलोली परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ एक बहुउद्देशीय स्मारक बांधण्यात येणार आहे. पाच एकर जागेवर साकारणाऱ्या या स्मारकासाठी १५ कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अंबरनाथ मतदारसंघामध्ये संविधान भवन उभारण्याचाही मानस आहे.
- अंबरनाथ शहराला स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय लाभणार आहे. २६ एकर जागेवर साकार होणाऱ्या या महाविद्यालयातून भविष्यात हजारो डॉक्टर घडतील; पण त्यासोबतच मतदारसंघातील व परिसरातील रुग्णांची सेवाही उत्तम दर्जाची होईल, असा विश्वास आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी व्यक्त केला आहे.
- चिखलोली येथे उभारण्यात आलेले दिवाणी न्यायालयाचे लवकरच लोकार्पण होणार आहे. या न्यायालयात पोहोचण्यासाठी रस्ता निर्मितीचे काम झपाट्याने मार्गी लावण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT