मुंबई

जागृती हायस्कूलने गटातील सामने जिंकून आव्हान कायम ठेवले

CD

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : डॉ. घाळी शालेय फुटबॉल लीगच्या दुसऱ्या दिवशी शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल, जागृती हायस्कूलने गटातील सामने जिंकून आव्हान कायम ठेवले. न्यू होरायझन स्कूल, साधना हायस्कूलने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयाची हॅटट्रिक केली. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर स्पर्धा सुरू आहेत.
रोमांचक सामन्यात जागृती हायस्कूलने एम. आर. हायस्कूलला २-१ असे नमवून आव्हान टिकविले. जागृतीच्या ऋतुराज अडसुळे, अनिरुद्ध पुजारीने गोल करून सहकाऱ्यांना जल्लोषाची संधी दिली. एम.आर.च्या ऋषिकेश भोसलेचा गोल संघाला पराभवापासून दूर ठेवू शकला नाही. शिवराज स्कूलने क्रिएटिव्ह स्कूलचा ४-० असा सहज पराभव केला. शिवराजच्या अरमान यळकुद्रे, शुभम कांबळे यांनी प्रत्येकी दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला.
साधना हायस्कूलने रेडेकर स्कूलवर ४-० अशी एकतर्फी मात केली. साधनाच्या श्रद्धेय साठेने दोन, आदित्य लाखे आणि अक्षय पोवारने प्रत्येकी एक गोल केला. एम. आर. हायस्कूलने समर्थ बेलेकरच्या निर्णायक गोलच्या जोरावर रेडेकर स्कूलला हरविले. जागृती विरुद्ध गडहिंग्लज हायस्कूल हा रंगतदार सामना १-१ असा बरोबरीत सुटला. जागृतीच्या अरमान मुल्ला, तर गडहिंग्लजच्या विनायक गोंधळीने गोल केले. ओमकार घुगरी, सूरज कोंडूस्कर, श्रवण पाटील, सागर पोवार, अमर गवळी, सूरज हनिमनाळे, प्रसाद पोवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT