विरार, ता. ७ (बातमीदार) : राज्यघटना आणि लोकशाहीसाठी यापुढे सर्व निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात याव्यात, यासाठी काँग्रेसने देशभर सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन वसई-विरार शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी केले आहे. त्यांनी नुकतेच वसई तहसीलदार यांना पत्र देऊन सर्व निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले. दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने हेच मतदान ६५.५ टक्के झाल्याचे जाहीर केले. एका रात्रीत ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसते. ही वाढ एकूण ७६ लाख मतांची असून, मतदानाचा टक्का एका रात्रीत कसा वाढला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव असे म्हणत सर्व निवडणुका मतपत्रिकांवरच घ्याव्यात, यासाठी काँग्रेसतर्फे स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष आल्मेडा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.