एनआरएमयूतर्फे डॉ. आंबेडकरांना
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली
शिवडी, ता. ७ (बातमीदार) ः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना स्मरण देण्यासाठी शुक्रवारी (ता. ६) नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने (एनआरएमयू) महापरिनिर्वाण दिवस साजरा केला. दरम्यान, माटुंगा येथील एनआरएमयू मुख्यालयात एनआरएमयूचे (सीआर/केआर) सरचिटणीस कॉ. वेणू पी. नायर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. समता, बंधुता आणि सर्वांचा आदर या मूलभूत तत्त्वांची आठवण करून देणारे डॉ. आंबेडकरांचे जीवन आशेचे आणि प्रेरणेचे दीपस्तंभ आहे. उपेक्षितांच्या उत्थानासाठी आणि न्याय्य समाजाच्या स्थापनेसाठीचे त्यांचे अतूट समर्पण केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात खोलवर गुंजते, असे सांगत डॉ. आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा दिला. एनआरएमयूने सर्व सदस्यांना डॉ. आंबेडकरांच्या परिवर्तनवादी व्हिजनचा स्वीकार करण्याचे आणि आपल्या संविधानात अंतर्भूत मूल्ये प्रतिबिंबित करणारा समाज निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.