मुंबई

थंडीमुळे गावठी अंड्याला मागणी

CD

थंडीमुळे गावठी अंड्यांना मागणी
कुक्कुटपालन कमी झाल्याने किमती वाढल्या
उरण, ता. ७ (बातमीदार) ः थंडीमुळे गावठी कोंबड्यांच्या अंड्यांना मोठी मागणी मिळत आहे. समुद्रसपाटीला वसलेल्या उरण तालुक्यात सध्या चांगली थंडी पडली आहे. थंडीमुळे गावठी कोंबड्यांच्‍या अंड्यांना प्रचंड प्रमाणात मागणी वाढली आहे. गावठी अंडी खाण्यासाठी पौष्टिक असून त्‍यामध्ये प्रोटीनेच प्रमाण सर्वाधिक असते. पूर्वी होणारे घरोघरी कुक्कुटपालन आता सद्यस्थितीत नव्या घरांमुळे कमी झाले आहे. त्यामुळे गावठी अंड्यांचा चांगलाच तुटवडा भासत आहे. परिणामी, अंड्यांच्या किमती वाढल्या आहेत.
गावठी कोंबड्यांची अंडी शरीरासाठी शक्तिवर्धक असतात. दमा असलेल्या रुग्णाला गावठी अंडे कच्चे खाण्याचादेखील सल्ला दिला जातो. अनेक औषधी गुणधर्म असल्याने या अंड्यांना मोठी मागणी मिळत आहे. त्याशिवाय गावठी कोंबड्यांची अंडी चवीलादेखील इतर अंड्यांच्या तुलनेत चविष्ट असतात. त्यामुळे गावठी कोंबड्यांच्या अंड्यांना सगळीकडेच चांगली मागणी मिळत असते. पूर्वी उरण तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी व वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात घरोघरी कुक्कुटपालन होत असे. घरोघरी गावठी कोंबड्या पाळल्या जात होत्या. कोणी घरी खास पाहुणे आले की, गावठी अंड्यांचा किंवा कोंबडीचा बेत हमखास असे; मात्र कालांतराने उरण तालुक्यातील घरांची रचना बदलली आहे. त्यामुळे नवीन घरात कुक्कुटपालन करणे मागे पडले आहे. त्यामुळे गावठी कोंबड्यांची संख्या कमी झाली आहे; मात्र अजूनही उरण तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये पूर्वीसारखेच कुक्कुटपालन होत आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्य नागरिक असो किंवा व्यापारी वाड्या-वस्त्यांमध्ये ही गावठी अंडी घेण्यासाठी जातात. तर, काही शेतकरी शेतात फार्महाउस बांधून कुक्कुटपालन करत असल्याचे दिसून येत आहे. थंडीत गावठी अंड्यांना मागणी वाढत असल्याने त्याचे भावही चांगलेच कडाडले आहेत. सध्या १५ ते २० रुपयाला एक अंडे मिळत आहे; मात्र तरीही उरण तालुक्यात गावठी अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे २० ते २५ रुपयाला एक अंडे मिळत आहे.
.......................
गावठी अंडी खाण्याचे फायदे
- गावठी अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.
- बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो.
- बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त
- गावठी अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट मिळतात.
...................
ग्रामीण भागात गावठी कोंबड्यांचे कुक्कुटपालन कमी झाले आहे. आम्हीदेखील आमच्या फार्महाउसच्या आवारात गावठी कोंबड्यांचे कुक्कुटपालन सुरू केले आहे. थंडी सुरू होण्यापूर्वी आम्ही १५ रुपयाला एक अंडे विकत होतो; मात्र थंडीत मागणी जास्त असल्याने अंड्यांचे भाव वाढले आहेत.
- शांताराम पाटील, कोंबडी उत्पादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT