मुंबई

वीर सावरकर मैदानात कचऱ्याचा ढीग

CD

वीर सावरकर मैदानात कचऱ्याचा ढीग
बच्चेकंपनीसह वृद्धांची कुचंबना; नगर परिषदेचे दुर्लक्ष
उरण, ता. ११ (वार्ताहर) ः उरण नगर परिषद हद्दीत एकमेव खेळाचे मैदान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाची दुरवस्‍था झाली आहे. या मैदानात सर्वत्र कचऱ्याचे ढीग जमा झाला आहेत. याकडे नगर परिषद कार्यालय दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
उरण शहरात एकमेव असलेल्या स्‍वातंत्र्यवीर सावरकर मैदानाचा बच्चेकंपनीकडून मोठ्या प्रमाणात खेळासाठी वापर केला जातो. या मैदानावर विविध शालेय मैदानी खेळाच्या स्पर्धा, फुटबॉल, कबड्डी स्पर्धा आदीचे आयोजन केले जाते. शिवाय हे मैदान फक्त मुलांना खेळण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र नगर पालिकेकडून खेळाच्या मैदनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुलांना खेळण्यासाठी असलेल्या एकमेव मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून कोणतीही सुविधा देण्यात आलेली नाही. विशेष म्‍हणजे त्‍याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मैदानात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्‍या वाहनांची पार्किंग केली जाते. मैदानात रात्रीच्‍या वेळी गर्दुल्ल्यांचा वावर असतो. त्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी महिलावर्गाकडून मैदानात जाणे टाळले जाते. गर्दुल्ल्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारूच्‍या बाटल्या टाकण्यात येतात. शिवाय प्लॅस्टिक कचऱ्याचादेखील समावेश आहे. एकीकडे स्‍वच्‍छ शहराचा नारा देण्यात येत असताना, अशा प्रकारे एकमेव असलेल्या मैदानात कचऱ्याचा ढीग जमा झाल्याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे. त्‍यामुळे नगरपालिकेने तत्‍काळ येथील कचरा हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
............................
मैदानासंदर्भात अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. लवकरच अधिकारीवर्ग एकत्र बसून हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच मैदानात दारू पिणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. परिसर स्‍वच्‍छ केला जाईल.
- निखिल धोरे, शहर अभियंता, उरण नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT