परराज्यातील बनावट मद्याच्या वाहतुकीवर छापा
५५ लाखांचा मद्याचा साठा जप्त; ठाणे राज्य उत्पादन विभागाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : हिमाचल प्रदेश आणि गोवा राज्यनिर्मित मद्याची वाहतूक करणाऱ्या एका सहाचाकी वाहनावर ठाणे राज्य उत्पादन विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ५५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक पूनमा राम धोकला राम गोदारा याला अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली.
डिसेंबरमध्ये नाताळ आणि नववर्ष स्वागताचे वेध लागतात. या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर अवैद्य मद्य विक्रीसह वाहतूक होत असते. ही वाहतूक व विक्री रोखण्यासाठी ठाणे राज्य उत्पादन विभागदेखील सज्ज झाला आहे. त्यानुसार शिळफाटा परिसरात शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी राज्य उत्पादन विभागाचे भरारी पथक एकचे पथक गस्तीवर असताना भारत गियर कंपनीजवळ सहाचाकी वाहनावर संशय आल्याने त्याची तपासणी केली. त्यामध्ये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य फॉर सेल इन द स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश तसेच गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्य व बिअर बॉक्स असे ७१० बॉक्स आढळून आले. त्यानुसार ठाणे राज्य उत्पादन विभागाने दारूचा साठा व सहाचाकी वाहन असा ५५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणे राज्य उत्पादन अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारीपथक एक निरीक्षक एम.पी. धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक एस.आर. मिसाळ आदींच्या पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.