मुंबई

ट्रेलरचा टायर फुटल्याने तलासरी उड्डाणपुलावर कोंडी

CD

कासा, ता. ७ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सिमेंट- काँक्रीटच्या अर्धवट कामामुळे वाहन अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनरचा टायर शुक्रवारी (ता. ६) दुपारी तलासरी उड्डाणपुलाजवळ अर्धवट कामामुळे फुटल्यामुळे ट्रेलर अपघातग्रस्त झाला. परिणामी, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

महामार्गावर अनेक ठिकाणी सिमेंट- काँक्रीटचे काम अपूर्ण असल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. काही ठिकाणी उलट दिशेने वाहतूक चालवली जात आहे; परंतु तेथे कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावलेले नाहीत. यामुळे वाहनचालक अंदाजाने वाहन चालवतात. परिणामी, रोजच अपघात होत आहेत. वाहनचालकांनी वारंवार सूचनाफलक लावण्याची व स्वयंसेवक नेमण्याची मागणी केली आहे; पण कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहेत. अपूर्ण कामामुळे अनेक वाहनांचे टायर फुटत आहेत, तर अपघातांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे.

शुक्रवारी झालेल्या घटनेत टायर फुटल्याने तलासरी उड्डाणपुलावर ट्रेलर बराच वेळ उभा राहिला, ज्यामुळे महामार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागली; मात्र महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार उपाययोजनांबाबत तत्काळ पावले उचलत नाहीत. वाहनचालकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रवास सुरक्षित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT