मुंबई

अल्पवयीन मुलीचे अश्लिल व्हिडियो व्हायरल

CD

अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल
उत्तर प्रदेशातील आरोपी तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरू

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या एकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच व्हॉट्सॲपवरून ओळख वाढवून मैत्री करून तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दीपू शेषनाथ चौधरी (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

१७ वर्षीय पीडित मुलगी तुर्भे परिसरात राहण्यास असून, ती सध्या शिक्षण घेत आहे. पीडित मुलीची सोशल मीडियावरून आरोपी दीपू चौधरी याच्याशी काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर त्याने व्हॉट्सॲपद्वारे पीडित मुलीसोबत मैत्री केली. त्यानंतर त्याने बुधवारी (ता. ४) मध्यरात्री पीडित मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत तिला कपडे काढण्यास भाग पाडले. यादरम्यान आरोपीने व्हिडिओ व स्क्रिन शॉट काढत हे दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल केले. हे व्हिडिओ पीडित मुलीच्या इन्स्टाग्रामवर झळकल्यानंतर पीडितेने ही माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर त्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दीपू चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT