शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचा विनयभंग
अंबरनाथ, ता.७ (बातमीदार) : अंबरनाथमध्ये एका शिक्षकाने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी शिक्षकाला पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात तीन विद्यार्थ्यांसोबत या शिक्षकाने अशा प्रकारचा लज्जास्पद प्रकार केल्याचे समोर आले आहे. आरोपी शिक्षक लैंगिक शोषण करतानाचा व्हिडिओ काढून त्याआधारे या विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करीत होता. यामध्ये पीडित विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नसल्याने त्यांच्या पालकांनी या विद्यार्थ्यांना विश्वासात घेतले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, या घटनेने पालकवर्गात संतापाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.