खालापुरात उंबरे येथील कामगार मृत्यप्रकरणी दोघांना अटक
खालापूर, ता.७ (बातमीदार) : भिंत कोसळून मातीचा ढिगारा अंगावर आल्याने दोन कामगारांचा मृत्यू तर चार मजूर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.५) घडली होती. याप्रकरणी पोकलेन चालक जितेंद्र मुखराम राजभर आणि मुकादम प्रमोद कुमार अवधेश पाल (दोघे राहणार उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
उंबरे येथील सनराज कंपनीच्या जागेमध्ये मातीचा भराव टाकण्याचे व काँक्रीटची भिंत बनविण्याचे काम सोबत सुरू होते. या वेळी भिंतीचे बांधकाम काम करणारे मजूर धर्मदेव कुमार, मनजित बहादूर, राकेश राजभर, जितेंद्र सिंग, राम चौहान आणि प्रेम सागर (सर्व राहणार उत्तर प्रदेश) यांनी पोकलेन चालक व सुपरवायझर यांना भिंतीजवळ मातीचा भराव टाकू नका असे सांगितले; तरीही भिंतीजवळ मातीचा भराव टाकण्याचे काम पोकलेन चालक जितेंद्र आणि मुकादम प्रमोद कुमार अवधेश पाल यांनी सुरू ठेवले. त्याच दरम्यान पोकलेनचा धक्का लागून निर्माणाधीन भिंत या कामगाराच्या अंगावर पडली. या मातीच्या ढिगाऱ्याखाली हे मजूर गाडले गेले. यामध्ये धर्मदेव कुमार, मनजित समर बहादूर यांचा मृत्यू झाला, तर इतर मजूर जखमी झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खालापूर पोलिसांनी आरोपींना शुक्रवारी (ता.६) अटक केली.
अधिक तपास पोसई अलोक खिसमतराव हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.