ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात
मुंबई, ता. ७ : ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनासंबंधी त्रास, थकवा आणि वारंवार चक्कर येत असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
‘कर्मा’, ‘राम लखन’ आणि ‘ताल’ यांसारख्या अजरामर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सुभाष घई हे भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचे दिग्दर्शक मानले जातात. विशेषतः ‘ताल’ चित्रपटातील अप्रतिम गाणी आणि दृष्ये आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. घई यांनी नुकतीच ‘ऐतराज २’ आणि ‘खलनायक २’ या चित्रपटांची घोषणा केली होती. २००४ साली आलेल्या ‘ऐतराज’ चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्याचे वृत्त ऐकून त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला होता. चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ आपल्या कलेने राज्य करणाऱ्या सुभाष घई यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करीत आहेत.
---
सुभाष घई - MUM24-E72060
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.