मुंबई

आदर्श विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश

CD

आदर्श विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश
मालाड, ता. ११ (बातमीदार) : अंधेरी येथे के/पी पश्चिम विभागीय, विज्ञान प्रदर्शन श्रीराम वेलफेअर सोसायटीज् हायस्कूलमध्ये ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनासाठी ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा विषय ठेवण्यात आला होता. या प्रदर्शनामध्ये आदर्श विद्यालय गोरेगाव (प.) या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी घवघवीत यश प्राप्त केले.
सहशालेय शिक्षक वक्तृत्व स्पर्धेत नेहल विचारे यांनी प्रथम क्रमांक पटकाविले, तर एकपात्री अभिनय स्पर्धेत ऋषभ विचारे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये लहान गट द्वितीय क्रमांकाने व मोठा गट प्रथम क्रमांकाने विजयी झाला. लहान गटातून ऋषभ विचारे व प्रज्वल कांबळे तर मोठ्या गटातून प्रियंका भोसले, दर्शनी वैराग हे विद्यार्थी सहभागी झाले होते. विज्ञान निबंध लेखन स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून निशा साळुंखे द्वितीय तर लहान गटातून चैतन्य वैराग याला प्रथम क्रमांक प्राप्त केला. शाळेच्या विज्ञान मंडळ जिज्ञासाने द्वितीय क्रमांक पटकावला. विज्ञान मंडळाच्या प्रमुख पाडळकर, चौधरी मॅडम व सोनावणे मॅडम यांनी कार्यभार पाहिला. विज्ञान प्रकल्पातील मोठ्या गटातून डिजिटल झेब्रा क्रॉसिंग या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला. या प्रकल्पात प्रियंका भोसले, वेदान्त विनोद टुकरूल हे विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना अरुणा खरात, कौस्तुभंजली किरतकुडवे, प्रभावती गडांकुश यांनी मार्गदर्शन केले होते. शाळेचे ग्रंथपाल सतीश दळवी यांनी पुस्तक प्रदर्शनात सहभाग घेतला होता.
या सर्व स्पर्धांमधील यशाचे फलित म्हणूनच आदर्श विद्यालयाच्या शिरपेचात ‘द्वितीय सर्वोत्कृष्ट शाळा’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मुख्याध्यापिका वर्षा मिलिंद शोभणे यांचे मार्गदर्शन लाभले.
MUM24E72301

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT