मुंबई

एपीएमसीत लालभडक गाजरांची गर्दी

CD

वाशी, ता. ११ (वार्ताहर) : राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाजारात लाल गाजरांची आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणात गाजर बाजारात आल्याने गाजरांचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. आठवडाभरापूर्वी २८ ते ६० रुपयांना मिळणाऱ्या गाजरांची किंमत घसरून १८ ते ३८ रुपये किलोवर आली आहे.
वाशीच्या एपीएमसी बाजारात गेल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक वाढली आहे. त्यात राजस्थान येथील जयपूरहून आलेले लाल गाजर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाशी एपीएमसी भाजीपाला बाजारात सोमवारी (ता. ९) २,२०९ क्विंटल गाजरांची आवक झाली. गेल्या आठवडाभरापासून चांगली आवक होत असल्‍यामुळे भावही काहीसे कमी झाले आहेत. लाल गाजरांसोबतच मध्य प्रदेशातून आलेली नारंगी रंगांची गाजरेदेखील बाजारात पाहायला मिळत आहेत. गाजर हे पीक भारतातील एक प्रमुख पीक असून बाजारात कमी-जास्त प्रमाणात बाराही महिने उपलब्ध असते. हिवाळ्यात गाजराला विशेष महत्त्व आहे. हरियाना हे गाजराचे प्रमुख उत्पादक राज्य असून कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून देशभरात गाजरे विक्रीस पाठवली जातात. यातील बिटा कॅरोटीनमुळे वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांपासून बचाव होतो. हिवाळ्यात पेशींमध्ये पाणी गोठू नये म्हणून गाजर आपल्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत करतात. यामुळे विशेषतः हिवाळ्यात गाजराचा गोडवा वाढलेला असतो. गाजरांचे अनेक प्रकार असले तरी देशी आणि विदेशी गाजर असा फरक करता येऊ शकतो. देशी गाजरे गडद लाल रंगाची असतात; तर विदेशी गाजरांचा रंग काहीसा फिकट लाल असतो. देशी गाजरे चवीला गोड असतात; तर विदेशी चवीला फिकट, पण पाणीदार असतात.
--------------
एपीएमसीतील सोमवारची आवक
२,२०९ क्विंटल
--------------
घाऊक भाव
१८ ते ३८ रुपये प्रतिकिलो

------------------
सध्या बाजारात गाजरांची आवक चांगली होत आहे. त्यामुळे भाव कमी झाले असून, गाजर खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढला आहे. थंडी वाढल्याने गाजरांनादेखील मागणी वाढली आहे. थंडीच्या काळात गाजर लवकर नरम पडत नाहीत. अधिक काळ टिकत असल्याने व्यापारी आणि विक्रेत्यांनाही त्याचा फायदा मिळतो.
- सुरेश गुप्ता, भाजी व्यापारी, एपीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Dombivli: क्रिकेट खेळताना चिमुकल्यावर काळ ओढवला; हसत्याखेळत्या कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त, मुंबईत नेमकं काय घडलं?

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

SCROLL FOR NEXT