मुंबई

भिवंडी पालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित

CD

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर महापालिका विभागीय समिती क्र. ५ चे लिपिक आणि सहाय्यक आयुक्त सोमनाथ बुध्या सोष्टे यांनी महापालिकेच्या लेखा विभागाने विविध कामांसाठी दिलेली ३२ लाख ६६ हजार रुपयांची आगाऊ रक्कम व ती कशी खर्च झाली, याबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे विभागीय चौकशीसाठी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.

भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयाच्या उपायुक्तांनी याप्रकरणी लेखा विभागाचे स्पष्ट मत घेण्यासाठी ही फाइल लेखा विभागाकडे पाठवली. आगाऊ रकमेचे समायोजन अद्याप बाकी असल्याचा अहवाल लेखा विभागाने महापालिका मुख्यालय उपायुक्तांना सादर केला होता. सोष्टे यांनी घेतलेल्या आगाऊ रकमेच्या समायोजनासाठी सादर केलेल्या फायलींकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. लेखापरीक्षण विभागाने केलेल्या त्रुटी दूर न केल्याचा ठपका या अहवालात सोष्टे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त सोष्टे यांना विभागीय चौकशीसाठी सेवेतून निलंबित करण्यात आले.

भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या निलंबनाच्या आदेशात, या कालावधीत कोणतीही खासगी नोकरी अथवा कोणताही व्यवसाय करू नये. निलंबन कालावधीत व्यवसाय करताना दोषी आढळले जाईल, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: हरिश राणाच्या इच्छामरणासाठी १३ वर्षे का लागली? कायदा, कोर्ट आणि वेदनेची पूर्ण कहाणी; ही पहिलीच केस नाही तर…

UPSC Fake Rank Case : युपीएससी उत्तीर्ण तरुणाचा आमदार अन् पोलिसांनी केला सत्कार; सत्य समजताच सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली

Indian Women Hockey: पात्रता मिळवली, आता लक्ष्य विजेतेपदाचे; भारतीय महिला हॉकी संघाचा आज इटलीविरुद्ध उपांत्य सामना

Viral Video: व्हायरल होण्यासाठी वादग्रस्त कृत्य! चेंबूरमध्ये आगरी-कोळी परंपरेचा अपमान, व्हिडिओनंतर उसळला संताप

'मी तिला किस करणार नाही' संजय दत्तने 'या' अभिनेत्रीसोबत किसिंग सीन करण्यास दिलेला नकार, म्हणालेला...'तिला मी...'

SCROLL FOR NEXT