पनवेल, ता. ११ (बातमीदार) : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवार (ता. १०) जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबिवण्याची मागणी या वेळी करण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात आले.
पनवेलमधील आंदोलनांच्या अनुषंगाने दोन हजार ५७० हिंदूंनी नोंद केली होती. या वेळी ‘भारत माता की जय’, ‘जय जय श्रीराम’, ‘बंद करा बंद करा अत्याचार बंद करा’, ‘एक है तो सेफ है’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर फलक दर्शवण्यात आले. बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लीम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. तेथील हिंदू महिलांवर अमानवीय अत्याचार होत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या अमानवीय अत्याचारांपासून मुक्ती मिळावी, बांगलादेश सरकारदेखील हिंदूंसह अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मूकसंमतीच देताना दिसून आले आहे. बांगलादेशात अलीकडेच सत्तांतर झाले व महंमद युनूस यांच्या नेतृत्वात अराजकाचे सरकार स्थापित झाले आहे. हिंदूंवर होत असलेले हल्ले, हत्या, लूटमार, दरोडे, जाळपोळीच्या घटना, महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याक समुदायातील मुले व महिलांवरील अमानवीय अत्याचार हा भारतातील हिंदू समुदायाला चिंता करायला लावणारा आहे, अशा भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या.
---------------
भारतातील हिंदूंमध्ये चिंता
इस्कॉनचे हिंदू धर्मगुरू श्री चिन्मय दास यांना बेकायदा अटक करण्यात आली. त्यांच्या वकिलांची हत्या करण्यात आली. त्यांच्या समर्थकांना भारताचा व्हिसा असतानादेखील भारतात येण्यास मनाई करण्यात आली. या सर्व अत्याचारांची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे. त्यामुळे तातडीने अत्याचार थांबण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मानवी साखळीतून जोरदार मागणी करण्यात आली. त्याचबरोबर अत्याचाराविरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.