पनवेल, ता. ११ (बातमीदार) : पनवेल पूर्ववरून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे मार्गावर एकच अरुंद पूल आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व महिलांना या पुलाचा वापर करताना गर्दीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक जण गर्दीच्या वेळी पादचारी पूल पार करणे टाळत असत; परंतु रेल्वे स्थानकात नव्याने पूर्व-पश्चिम पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने रेल्वे स्थानकातील अरुंद पुलावरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्व-पश्चिम जाणे सुलभ होणार आहे.
पनवेल हे हार्बर लाइनवरील शेवटचे स्थानक आहे. त्याचबरोबर याच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या गाड्याही सुटतात. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिडकोचा ‘नैना’ प्रकल्प, मेट्रोचे जाळे, जेएनपीएचा विस्तार, तसेच शिवडी-न्हावा-शेवा सी-लिंक या पूर्णत्वास येऊ लागलेल्या प्रकल्पांमुळे भविष्यात पनवेल शहर विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल परिसरातच असल्याने या विभागातील दळणवळण यंत्रणाही अधिक सक्षम करण्याची गरज आहे. लोकलबरोबर पनवेल स्थानकातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात, त्यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. भविष्यात या स्थानकांवर आनखी ताण वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यानंतर या स्थानकाला आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे, तसेच ‘नैना’ क्षेत्राच्या संपूर्ण विकासानंतर सध्याच्या पनवेल स्थानकाला मर्यादा पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून पनवेल स्थानक अधिक सुसज्ज बनवण्याची गरज आहे. त्या अनुषंगानेच या स्थानकात होणारी गर्दी पाहता पूर्व-पश्चिम जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत होती. त्यामुळे आता पनवेल रेल्वे स्थानकात नवीन बनत असलेल्या पादचारी पुलामुळे रेल्वे प्रवाशांसह रेल्वे लाइन ओलांडणाऱ्या नागरिकांचीही सोय होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.