मुंबई

आरटीओच्या सर्व्हर डाऊनमुळे खोळंबा

CD

वाशी, ता. ११ (वार्ताहर) : वाहन परवाना काढण्यासाठी आवश्यक असलेल्या संकेतस्थळाचे सर्व्हर मागील तीन दिवस डाऊन असल्यामुळे अनेकांची कामे रखडली आहेत. अनेक वाहनधारकांना आपल्या कागदपत्रांसाठी तासनतास नवी मुंबई आरटीओ कार्यालयात घालवावे लागत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नवीन वाहन परवाना, परवान्याचे नूतनीकरण, परवान्यावरील पत्ता बदलणे इत्यादी कामांसाठी वाहनधारक परिवहन कार्यालयाला जात असतात. आरटीओकडून मिळणाऱ्या या सेवा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने पुरविल्या जातात; परंतु सोमवारपासून (ता. ९) राष्ट्रीय सूचना केंद्राच्या (एनआयसी) सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नेरूळ येथील नवी मुंबईतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारपासून लागोपाठ तीन दिवस वाहनधारकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्व्हर सुरू नसल्याने अनेकांची कामे रखडली आहेत. सर्व्हर डाऊनचा फटका आरटीओच्या कामकाजालादेखील बसला असून, दररोज मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सर्व्हर सुरू होण्याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांनाही कल्पना नसल्याने वाहनधारकांना तारीख पे तारीख दिली जात आहे. याबाबत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवनहच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
-----------
मी रिक्षाचालक आहे. मागील तीन दिवसांपासून नेरूळच्या आरटीओ कार्यालयात चकरा मारतो आहे. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हर बंद असल्याने ‘उद्या या’ हेच कारण अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत. यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असून, दररोज कामधंदा बुडत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.
- सिद्धार्थ गुळूंबे, रिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

इलॉन मस्कने लॉन्च केले 'Macrohard'! आता एकटा AI करणार संपूर्ण ऑफिसच काम; किती किंमतीत करता येणार खरेदी? पाहा सर्व माहिती

Summer Hydration Tips: उन्हाळ्यात ‘ही’ 3 पेये ठरतात शरीरासाठी रामबाण; डिहायड्रेशन टाळण्यासाठी तर आहेत बेस्ट

SCROLL FOR NEXT