मुंबई

मुरूम वाहतूकप्रकरणी १५ लाखांच्या दंडाची वसुली

CD

मनोर, ता. ११ (बातमीदार) : मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी महसूल बुडवून मुरूम वाहतूक केल्याप्रकरणी कंत्राटदार कंपन्यांकडून आठ लाख ८९ हजार रुपये, तर ओव्हरलोड वाहतूकप्रकरणी प्रादेशिक परिवहन विभागाने दहा ट्रकमालकांकडून सहा लाखांच्या दंडाची वसुली केली. त्यामुळे अनधिकृतपणे मुरूम वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.

मुरूम वाहतूक करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांना तहसीलदारांनी प्रत्येक ट्रकसाठी दोन लाख ५६ हजार रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या होत्या; परंतु वाहतूक परवाना असल्यामुळे प्रत्येक वाहनामागे दोन लाख रुपयांचा वाहन दंड माफ करून संपूर्ण मुरूम अनधिकृत ठरवून पाच पट दंड वसूल केल्याची माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली. महसूल विभागाच्या कारवाईनंतर प्रादेशिक परिवहन विभागाने ओव्हरलोड वाहतूकप्रकरणी ट्रकमालकांकडून सहा लाखांचा दंड वसूल केला. मुरूम वाहतुकीच्या परवान्यांमध्ये तफावत आढळून आल्याने ट्रक जप्त करून ठेकेदार कंपन्यांना प्रत्येक वाहनामागे दोन लाख ५६ हजार ४५० रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या. एकूण ४३ लाख ६९ हजार ६५० रुपये दंडवसूल केला जाणार होता; परंतु शासन निर्णयानुसार वाहतूक परवाना असल्यामुळे वाहन दंड आकारता येत नसल्याने १७ ट्रकच्या वाहन दंडाची रक्कम माफ केल्यानंतर संपूर्ण मुरूमावर पाच पट दंड आकारणी करून एकूण आठ लाख ८९ हजार ६५४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांकडे वाहतूक परवाने होते; परंतु वाहनामध्ये परवान्यापेक्षा अधिक मुरूम आढळून आला. परवाना असल्यामुळे दोन लाखांचा वाहन दंड वगळून मुरूमासाठी पाच पट दंड आकारणी करून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. निवडणूक काळात केलेली वाहतूक आणि उत्खननाच्या ठिकाणी पाहणी आणि पंचनामे करण्याचे निर्देश मंडळ अधिकाऱ्यांना दिले जातील.
- रमेश शेंडगे, तहसीलदार, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT