नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर): कोपरखैरणेतील बोनकोडे गावात बनावट आधार, पॅन कार्ड बनवून अनेक वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी सकाळी ही कारवाई केली.
कोपरखैरणे सेक्टर-१२ मधील बोनकोडे गावात बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्यास असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने संशयित घरावर छापा मारला. घरामध्ये अशरफुल राशद शेख (४०) त्याची पत्नी माजीद अशरफुल शेख (३८), तसेच अमीर हुसेन शेख उर्फ सागर कुद्दुस शेख (३५) व समीरा कमल चौधरी (३९) व तिची ८ वर्षांची मुलगी राहत असल्याचे आढळून आले. चौघांकडे वयाचा, जन्म, शाळा सोडल्याचा, मूळ गावचा रहिवासी दाखला नसल्याचे आढळून आले, मात्र अमीर हुसेन शेख व समीरा कमल चौधरी यांच्याकडे आधार, तसेच पॅन कार्ड असल्याने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी, तसेच विदेशी नागरिक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.