भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : पिंपळास गावच्या हद्दीतील ३०० एकर जमीन खरेदीच्या नावाखाली विकसकाची ७८ कोटींची फसवणूक करणाऱ्या दलालावर तब्बल १९ वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मुंबईतील भायखळा येथे राहणारे विकसक दिलीपकुमार जैन यांचा भिवंडीतील दापोडा गावच्या हद्दीतील ग्लोबल कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. भिवंडीतील पिंपळास गावच्या हद्दीत जैन यांनी ३०० एकर जमिनीसाठी १६ मार्च २००६ ते १ मार्च २०२४ या कालावधीत ७८ कोटी ३५ लाख ५१ हजार १६५ रुपये माटुंगा पूर्वेतील आशीष शहा याला दिले होते; पण आशीषने फक्त १५० एकर जमीन करून अन्य जमिनीचा ताबा स्वतःसाठी केला होता. याबाबत जैन यांनी आशीष शहा यांच्याशी संपर्क केला असता त्याने धमकी दिली होती. याप्रकरणी मंगळवारी (ता. १०) विकसक दिलीप यांच्या फिर्यादीवरून आशीष शहाविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.