मुंबई

हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

CD

हुतात्मा बाबू गेणू यांच्या पुतळ्याला जलाभिषेक
कांदिवली, ता. ११ (बातमीदार) : हुतात्मा बाबू गेणू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील १७ वर्षे प्राणज्योत सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा बलिदान भूमी काळबादेवी (मुंबई) ते जन्मभूमी महाळुंगे पडवळ (पुणे) १८ व्या प्राणज्योतीचे मुंबईत ठिकठिकाणी जंगी स्वागत केले. काळबादेवी येथे विभाग अध्यक्ष बबन महाडिक यांच्या हस्ते ९४ व्या पुण्यतिथीनिमित्त प्राणज्योत प्रज्वलित केली. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, माजी नगरसेवक अशोक पुरोहित, शेखर पांडे, तसेच महाळुंगे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी
बाबू गेणू यांचा इतिहास सांगण्यात आला, तसेच ''सांडला कलश रक्ताचा'' पुस्तक मान्यवरांना भेट देण्यात आले. पुढे भायखळा येथील बाबू गेणू यांच्या घोडपदेव डीपी वाडी येथील निवासस्थानी ज्योतीचे स्वागत व पूजन बुवा कुलकर्णी यांनी केले. परळ येथील कामगार मैदानातील हुतात्मा बाबू गेणू यांच्या अर्धपुतळ्याला मुंबई पोलिस, विशेष महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला. पोलिस निरीक्षक सचिन कदम यांनी पुष्पहार अर्पण करून ज्योतीचे पूजन केले. हुतात्मा बाबू गेणू अमर रहे अशा घोषणांनी सारा परिसर भारावून गेला. घाटकोपर येथील अभ्युदय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ढोल-लेझीमच्या पथकाने प्राणज्योत पायी यात्रेचे जंगी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Crypto Scam : पोलिसांना गुंगारा देणारी डॉक्टर जोडी गजाआड! मिरजेत हाय-प्रोफाइल छापेमारी; इब्राहिम आणि जास्मिनच्या घरात नेमकं काय सापडलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

'कुत्र्याने माझ्या मांडीला चावा घेतला आणि...' मुळशी पॅटर्नमधल्या पिट्या भाईने सांगितली भयंकर घटना, म्हणाला...'माझ्याजागी जर...'

SCROLL FOR NEXT