मुंबई

जव्हारमध्ये लोकराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांना अभिवादन

CD

जव्हारमध्ये लोकराजा यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांना अभिवादन

जव्हार, ता. ११ (बातमीदार) : फ्लाईंग लेफ्टनंट यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांची १०७ वी जयंती बुधवारी (ता. ११) जव्हार शहरात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. या वेळी विविध पक्षांचे आजी, माजी पदाधिकारी, सर्वपक्षीय पुढारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने जव्हार शहर वसवल्यानंतर सर्वच वास्तू, या देणगीच्या रूपात मदत करून संस्थानकालीन शहर उदयास आणले होते. त्यांचे हे कार्य येथील जनतेला पालकत्वाची जाणीव करून देते आणि देत राहणार असल्याची भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
आदिवासी भागाचा विकास करावयाचा असल्यास आदिवासी जिल्ह्याची निर्मिती करून तो भाग रेल्वेने जोडला तरच विकास होईल, अशी लोकसभेत प्रथम मागणी यशवंतराव मार्तंडराव मुकणे यांनीच केली होती. या घटनेचेही या वेळी स्मरण करण्यात आले. त्यांनी स्वातंत्र संग्रामास वेळोवेळी छुपा पाठिंबा व मदत केली, तर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या इमारतीच्या उभारणीसाठी १९४० साली पाच हजारांची मदतही केली होती. त्यामुळे शैक्षणिक चळवळींना चालना मिळाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
मुकणे राजघराण्याच्या वैभवशाली इतिहासात जव्हार राज्य अहमदनगर ते ठाणे जिल्ह्यातील शहापूर भिवंडी ते पश्चिमेकडे वसई बंदर, तर उत्तरेकडे दिव-दमणपर्यंत विस्तारित होते. विविध नवीन उदयोतित भोसले, पेशवे, इंग्रज राजवटीत कालांतराने ते कमी कमी होत गेले. अशा कर्तव्यदक्ष राजे यशंवतराव मुकणे महाराज यांचे स्मरण करीत आठवणींना उजाळा देत नागरिकांनी जयंतीदिनी शुभेच्छा देत राजेंना अभिवादन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

Latest Marathi Live Update : नाशिकमध्ये परप्रांतीय ठेकेदाराकडून सुपरवायझरला बेदम मारहाण

LPG Gas Shortage: वडापाव चाळिशीपार, चहा तिशीला! चाकण औद्योगिक वसाहतीतील स्थिती; भजी खाणेही आवाक्याबाहेर

SCROLL FOR NEXT