मुंबई, ता. ११ : म्हाडाची राज्यभरात जवळपास अकरा हजार घरे विक्रीअभावी पडून असल्याने कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे यापुढे मागणी असेल तर घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
विरार, पुणे, संभाजीनगर, अमरावती, नाशिक परिसरात म्हाडाची अनेक घरे विक्रीअभावी पडून आहेत. रखडलेल्या गृहप्रकल्पांमुळे जवळपास ३,१०० कोटींचा निधी अडकला आहे. या घरांच्या विक्रीसाठी जाहिरातबाजी करूनही घरे विकली जात नाहीत. त्यामुळे म्हाडाने आता सावध भूमिका घेतली आहे. यापुढे गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याआधी घरांच्या मार्केटचा अभ्यास केला जाणार आहे. त्याकरिता ऑनलाइन आणि एजन्सीच्या माध्यमातून सर्व्हे केला जाणार असून खासगी विकसकांप्रमाणे ॲडव्हान्स बुकिंग घेऊनही घरांचा प्रकल्प राबवता येईल, याबाबत विचार सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.