मुंबई

कामाठीपुराच्या पुनर्विकासात नगरविकासची आडकाठी

CD

बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वर्षानुवर्षे रखडलेला कामाठीपुराचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. राज्य सरकारने म्हाडाला नियोजन प्राधिकरण म्हणून मंजुरी दिली आहे, मात्र त्याबाबतचा अध्यादेशच नगर विकास विभागाने काढला नसल्याने विकसकाच्या नियुक्तीसाठीची निविदा प्रसिद्ध झाली नसल्याने कामाठीपुराच्या पुनर्विकासाचे घोडे अडले आहे.
कामाठीपुरा ही ३४ एकर जागेवर वसली असून, ७७१ जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये साडेसात हजार रहिवासी वास्तव्याला आहेत. म्हाडाकडून या इमारतींचा समूह पुनर्विकास बीडीडी चाळ पुनर्विकासाप्रमाणे केला जाणार होता. त्यासाठी राज्य सरकारने २०२३ मध्ये म्हाडाला नियोजन प्राधिकरण म्हणून मंजुरी दिली होती. नोडल एजन्सी म्हणून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने खासगी विकसकाच्या मदतीने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विधानसभा निवडणुकीआधी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनीची नियुक्ती केली आहे, पण राज्य सरकारने म्हाडाला विकास प्राधिकरण म्हणून मंजुरी दिलेली असताना त्याबाबतचा अध्यादेश नगर विकास विभागाने काढलेला नाही. त्यामुळे विकसकाच्या नियुक्तीसाठीचे टेंडर प्रसिद्ध करण्याबाबत वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेण्याची वेळ म्हाडावर आली आहे. तसेच नगर विकास विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे कामाठीपुराच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला विलंब झाल्याची बाब म्हाडाचे अधिकारी कबूल करत आहेत.
--------
रहिवाशांना ५०० फुटांची सदनिका
कामाठीपुरा येथील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची सदनिका दिली जाणार असून जागा मालकाला प्रति ५० चौरस मीटर जागेकरिता ५०० चौरस फुटांची एक सदनिका मिळणार आहे. त्यासाठी म्हाडाने संपूर्ण पुनर्विकास प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार केला असून, येथे ५३ मजली इमारती उभारण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यासाठीच विकसकाची नियुक्ती केली जाणार होती, मात्र नियोजन प्राधिकरणाची सर्व प्रक्रिया थांबली आहे.
-----------
मुंबई महापालिकेकडून रस्सीखेच
कामाठीपुराचा पुनर्विकास करण्यासाठी आम्ही नियोजन प्राधिकरण म्हणून असावे, अशी भूमिका मुंबई पालिकेने घेतली आहे. त्यासाठी पालिकेकडून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामाठीपुराचा पुनर्विकास आमच्या माध्यमातून व्हावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मुंबईमध्ये अन्य कोणाचीही विशेष नियोजन प्राधिकरण (एसपीए) म्हणून नेमणूक करू नये, महापालिकेची जुनी भूमिका असल्याचेही स्पष्ट केले.
------
म्हाडाच्या हौसिंग स्टॉकचे काय?
म्हाडाच्या माध्यमातून कामाठीपुरा पुनर्विकास केल्यास नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाला जवळपास ९००-१००० घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. कोट्यवधी किमतीची ही घरे असणार आहेत, मात्र योजना प्राधिकरणाचा दर्जा मिळाला नाही, तर म्हाडाला हौसिंग स्टॉक मिळणार कसा, हा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

Latest Marathi News Live Update : माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात इराणच्या समर्थनार्थ आंदोलन

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

SCROLL FOR NEXT