मुंबई

काँग्रेस नेते मनोज शिंदेंचे शिवसेनेत प्रवेश

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.११ : काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते. अखेर बुधवारी (ता.११)उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील निवासस्थानी मनोज शिंदे यांनी प्रवेश केला.
ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्षही होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकण पट्ट्यात काँग्रेस पक्षाला जागा दिल्या नसल्यामुळे मनोज शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कोपरी-पाचपाखाडी मतदार संघामधून बंडखोरी करीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढविली. या बंडखोरीमुळे ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांचे मताधिक्य कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. प्रत्यक्षात मात्र मनोज शिंदे यांना के‌वळ १ हजार ६५३ इतकीच मते मिळाली होती. दरम्यान, मनोज शिंदे यांनी जन्मदिनाचे औचित्यसाधत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी अधिकृतरीत्या प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिर गाभारा दर्शन चार दिवस राहणार बंद; मंदिर प्रशासनाकडून माहिती

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

'शुभविवाह' मालिकेतील अभिनेत्रीचा बदललेला लूक पाहून चाहते थक्क; आजार की आणखी काही?

Pune Municipal Corporation: कनिष्ठ अभियंत्यांच्या भरती रखडल्याने महापालिका ‘टुलीप’ इंटर्नशिपवर अवलंबून

SCROLL FOR NEXT