विषारी वायूमुळे नागरिकांना त्रास
बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीकडून प्रदूषण
बदलापूर, ता. ११ (बातमीदार) ः बदलापूर एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीने थंडीतील धुक्याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रासायनिक वायू हवेत सोडला. काही वेळातच हा विषारी वायू दोन ते तीन किमीपर्यंत पसरल्याने नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कंपनीतील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने सायंकाळी हवेत गारवा आणि धुके पसरले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका कंपनीतून रासायनिक विषारी वायू पसरल्याने बदलापूर पूर्व परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्याचा तसेच डोळे चुरचुरण्याचा त्रास सुरू झाला. अवघ्या काही वेळात हा विषारी वायू दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात पसरल्याने संबंधित कंपनीवर कारवाई करणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी एमआयडीसीत जाऊन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
----
रात्रीच्या वेळी अनेक कंपन्या विषारी वायू हवेत सोडतात. रासायनिक वायूमुळे परिसरातील नागरिकांना घसा खवखवणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, खोकला, डोकेदुखी आणि डोळे चुरचुरण्यासारखे त्रास जाणवू लागले.
- विनायक पाटील, अग्निशमन अधिकारी, बदलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.