ठाणे, ता. १३ : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी पाच वाजता एक आकडेवारी सांगण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत मतदान केंद्रांवर एक चतुर्थांश मते वाढल्याने निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशीची गर्दी दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच १३ टक्के मते वाढल्याने सर्व पराभूत उमेदवारांनी न्यायालयात दाद मागावी, असे आवाहनही केले.
राज्यातील १४३ केंद्रांत लाखांनी मते वाढल्याने झालेले मतदान संशयास्पद आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकातून मते टाकल्याने कोल्हापूरची मते कमी करण्यात आली. आजूबाजूच्या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा पराभव हा सारख्या मताधिक्याने झाला आहे. ईव्हीएम मशीन आणि १७ (सी) अर्जात तफावत असल्याने सर्व पराभूत उमेदवारांनी न्यायालयात दाद मागावी, असे आवाहन आव्हाड यांनी केले.
-----------------------------------------------------
‘एकही खासदार फुटणार नाही’
वाढदिवसानिमित्ताने अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. याबाबत आव्हाड यांनी विचारले असता, यावर्षी ते भेटायला गेले त्याचा आनंद आहे, परंतु गेल्या वर्षी गेले नव्हते याची आठवण करून देताना आमचा एकही खासदार फुटणार नसल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.