नवी मुंबई, ता. १३ : तळोजा फेज एकमधील आयशा हॉटेलने जागेची मर्यादा ओलांडत अनधिकृत बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे स्थानिकांना, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हॉटेलच्या आडून मदरसा सुरू असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज एकमधील सेक्टर दोनमध्ये असलेल्या आकार रेसिडेन्सी येथे ‘आयशा’ नामक हॉटेल आहे. हॉटेल मालकाने अनधिकृत बांधकाम करून बाहेरील जागेत किचन, तसेच पदपथावरही अतिक्रमण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे येथे हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली मदरसा चालवला जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. तसेच, अनधिकृत बांधकामाचे फोटो, व्हिडिओसुद्धा त्यांच्याकडे आहेत; पण तक्रार करणाऱ्यांना हॉटेल मालकाकडून धमकावण्याचा प्रकार होत असल्याने याप्रकरणी चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
---------------------------------------------
बेकायदा बांधकामामुळे रोष
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक तीनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आयशा हॉटेलच्या ठिकाणी विटांचे बांधकाम, पत्र्याची शेड असे जवळपास २,०८८ चौरस फूट सर्रासपणे अनधिकृत बांधकाम आहे. हॉटेलच्या आडून मदरसा चालवला जात असल्याने नागरिकांमध्येही असंतोष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.