जव्हार, ता. ७ (बातमीदार) ः शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुटखाविक्री जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे लहान मुलांमध्ये व्यवसायाचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गातून गुटखाविक्रीवर रोख लागावी, म्हणून आंदोलनाची तयारी केली आहे. परिसरातील पानटपरी, दुकानांच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे.
राज्यात गुटखाबंदी असतानाही गुटख्याची सर्वत्र खुलेआम विक्री होत आहे. यात जव्हार शहर तथा तालुका परिसरदेखील पिछाडीवर नाही. त्यामुळे गुटखाबंदी कायदा नावालाच उरला असून याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शहरासह ग्रामीण भागातसुद्धा दुकानांवर सहज गुटखा मिळत असून रस्त्यांवर पुड्यांचा खच साचत असल्याचे दिसून येत आहे. हे थांबणे आवश्यक असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिला पुढे सरसावत आहेत.
राज्यात गुटखाबंदीचा कायदा झाला; परंतु त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून गुटखातस्करी जोरात सुरू आहे. राजरोसपणे गुटखाविक्री सुरू आहे. बाहेरून रात्री-अपरात्री येणाऱ्या गाड्यांतून गुटखातस्करी होते. परराज्यातून ट्रक, कंटेनरद्वारे गुटखा राज्यात आणून साठवणूक होत असून मागणीनुसार दुकानदारांना गुटखा पोहोच केला जात असल्याचे दिसून येते. जागोजागीच्या काही टपऱ्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या गुटख्यामुळे नक्की बंदी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
जव्हार शहर तथा ग्रामीण भागात गुटखा आणि सुगंधित तंबाखू सर्रास विक्री होते. आजची तरुणाई या व्यसनात गुरफटत आहे. यावर ठोस उपाययोजना केल्यास अवैध गुटखाविक्री थांबून तरुणाई धोक्यात येणार नाही. शिवाय, अन्न आणि औषध प्रशासनाने नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
- वंदना ठोंबरे, सदस्य, कौलाळे ग्रामपंचायत
जव्हार शहर तथा ग्रामीण भागात अवैध गुटखाविक्रीबाबत नाका परिसरात नियमित तपासणी केली जात आहे. नागरिकांना जर कुठे असा प्रकार समजल्यास पोलिसांना कळवावे.
- किशोर मानभाव, प्रभारी अधिकारी, जव्हार पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.