कामोठे, ता. ७ (बातमीदार) : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारने बाधितांचे पुनर्वसन केले. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ८६ आदिवासी भागामध्ये दरडप्रवण क्षेत्रातील वाड्यांचे पुनर्वसन चौक, नढाळ वरसेवाडी या भागात करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोक आंदोलन न्यास संघटनेच्या कार्याध्यक्ष कल्पना इनामदार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
रायगड जिल्ह्यात अतिशय दुर्गम भाग, मोठे डोंगर, पर्वतरांगा, घनदाट जंगल आहे. आदिवासी समाज अतिदुर्गम भागात राहत असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने दुर्गम दरडप्रवण क्षेत्रातील आदिवासीवाड्यांना धोका निर्माण होतो. १९ जुलै २०२३मध्ये इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. त्या घटनेतील निष्पाप आदिवासींना रस्ता नसल्यामुळे वेळेत मदत देऊन वाचवण्यात यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागला होता. या दुर्घटनेत बरीच आदिवासी कुटुंबे दरड कोसळल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडली होती. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारने इर्शाळवाडीचे पुनर्वसन केले. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत, सुधागड, पेण, रोहा, पनवेल, अलिबाग तालुक्यांतील ८६ वाड्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे, असेही इनामदार यांनी निवेदनात म्हटले आहे.
--------------------
...तर आदिवासींचा विकास होईल
आदिवासी समाज रायगड जिल्ह्यातील असल्यामुळे याच जिल्ह्यात त्याचे पुनर्वसन झाल्यास खालापूर, चौक, कर्जत या भूभागावर दळणवळणाचा मार्ग मोकळा होईल. शिक्षणप्राप्तीसाठी आदिवासी समाजाची मुले बाहेर पडतील. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा विकास होईल. आदिवासी समाज इतर समाजासरखा सुसंस्कृत होईल. आपली पारंपरिक जीवनपद्धत सोडून नोकरी व उद्योग-व्यवसायासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरू शकतो, असा विश्वास इनामदार यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.