वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वायूप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० डिसेंबरपासून नवी मुंबईतील विविध क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दिघा विभागामध्ये एमआयडीसी रस्त्यावर बिस्किट गल्ली हजेरी शेडपर्यंत सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून ऐरोली विभागातही दिवा सर्कल ते टी जंक्शनपर्यंत स्वच्छता करण्यात आली. सखोल स्वच्छता मोहिमेअंतर्गत रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्या कडेला साठलेली माती ब्रशझाडू आणि फ्लिपर मशीनद्वारे उचलून घेण्यात आली, तसेच स्प्रे मशीनद्वारे रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांवरील पादचारी पूल, शिल्पाकृती, बस स्टॉप यांचीही सखोल साफसफाई करण्यात आली. कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरात तसेच इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात सखोल स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या. आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध रस्त्यांच्या स्वच्छता मोहिमांचे नियोजन करण्यात आले असून आयुक्त कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळीचे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सखोल साफसफाई करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.