मुंबई

संक्रांतीनिमित्त रंगीबेरंगी पतंगांनी बाजारपेठ सजली

CD

नेरूळ, ता. ६ (बातमीदार) : इंग्रजी वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. वर्षभरातील प्रमुख सणांपैकी एक असलेला हा उत्सव देशभरात साजरा केला जातो. या दिवशी ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा शुभेच्छा देऊन एकमेकांना तिळाचे लाडू वाटले जातात. तसेच या सणानिमित्त पतंग उडविण्यालाही विशेष महत्त्व आहे. कोणाचा पतंग सर्वांत भारी, कोणाचा पतंग उंच आभाळात गेला, कोणाचा पतंग कोणी छाटला ही सगळी गंमतजंमत काही औरच असते. आठवड्यावर येऊन ठेपलेल्या सणासाठी बाजारात लगबग सुरू असून ग्राहकांसाठी तीळगूळ, गजक, रेवड्या, साखरेच्या हलव्याबरोबर रंगीबेरंगी पतंग लहानांपासून मोठ्यांचे लक्ष वेधत आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त बाजारात प्लॅस्टिकचे, कागदी आणि कापडी असे पर्याय उपलब्ध आहेत. कापडी पतंगांत गरुड, फुलपाखरू, वाघ, ड्रॅगनची चित्रे पाहायला मिळतात. हे पतंग ७० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक प्रिंटमध्ये छोटा भीम, डोरेमॉन, बार्बी, बेनटेन उपलब्ध आहेत; तर विविध फोटो प्रिंट असलेले पतंगही बाजारात दाखल झाले आहेत. कागदी पतंगांत चांद-तारा आणि तिरंगा प्रसिद्ध आहेत. या पतंगांची किंमत अवघी पाच ते दहा रुपये आहे. अशा विविध आकारांचे फॅन्सी कार्टुन असलेल्या पतंगांना विशेष मागणी दिसून येत आहे. आकारानुसारच्या पतंगांसाठी १०० ते ४०० रुपये भाव आहे. त्याच्या सोबतीला मांजासुद्धा बाजारात उपलब्ध आहे. मोबाईलच्या महाजालात अडकलेली तरुणाई संगणक किंवा मोबाईलवर खेळ खेळण्यात गुंग आहे. तरुणांना मैदानी खेळांचा विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर पतंग उडवण्यातही रस राहिलेला नाही. त्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये पतंग, मांजा विक्रीमध्ये मंदी आली आहे. यंदा तर ५० टक्क्यांनी विक्री घटली आहे. एकेकाळी पतंग बनवणारे कारागीर होते; परंतु काळाच्या ओघात या कारागिरांची संख्या घटली आहे.
-------------------
नायलॉन मांजा ‘नो’
यंदा दुकानदारांनी नायलॉनचा मांजा विकणार नसल्याचा संकल्प केला आहे. कारण मांजामुळे अनेकदा बोट कापण्याचा किंवा पक्ष्यांना इजा होण्याचा धोका असतो. शिवाय दुचाकीस्वारांनादेखील जीव गमावावा लागल्याने प्रशासनाने मांजावर बंदी घातली आहे. त्यामुळे व्यापारांकडूनही यंदा नायलॉन धाग्याऐवजी अन्य मांजाचा वापर करावा यासाठी ग्राहकांना आवाहन केले जात असल्याची माहिती पतंग विक्रेते लक्ष्मण चौधरी यांनी दिली आहे.
-----------
मकर संक्रांतीनिमित्त विविध रंगीत पतंग विक्रीसाठी आले आहेत. याची किंमत आकारानुसार आहे. आजकाल सजावटीसाठीदेखील पतंगांचा वापर केला जातो. धोकादायक नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे.
- लक्ष्मण चौधरी, पतंगविक्रेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT