मुंबई

सतीश प्रधानांमुळे ठाणे शहराला आकार : नरेश म्हस्के

CD

सतीश प्रधानांमुळे ठाणे शहराला आकार : नरेश म्हस्के
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे शहराला आकार देण्याचे काम सतीश प्रधान यांनी केले. त्यांच्या कर्तृत्वामुळे ठाणे शहराने राष्ट्रीयस्तरावर वेगळा ठसा उमटवला, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. ज्ञानसाधना महाविद्यालयात आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते. ठाणे शहरात सतीश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.

ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लेखक प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, नाट्य दिग्दर्शक अशोक समेळ तसेच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रधान यांच्या योगदानाची आठवण करून दिली. या वेळी प्रधान यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

एखाद्या शहराची उंची त्या शहरातील स्टेडियम, नाट्यगृह, महाविद्यालय, तरण तलाव, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील वास्तू, ग्रंथालये यावरून ठरते. या ठाणे शहराला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनविण्याचे काम सतीश प्रधान यांनी केल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी सतीश प्रधान यांनी उभारलेल्या वास्तू ठाणे शहरासाठी आजही प्रेरणादायी आहेत, अशी भावना व्यक्त केली. या वेळी शिक्षण, खेळ आणि सामाजिक संस्थांच्या उभारणीत वडिलांनी दिलेला हातभार कायम स्मरणात राहील. त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे काम करण्याचा निर्धार सतीश प्रधान यांचा मुलगा कमलेश प्रधान यांनी केला.

सर्वच क्षेत्रात योगदान
प्रधान यांनी ठाण्याला ओळख निर्माण करून दिली. ठाणे शहर नेहमीच उपक्रमशील राहण्यासाठी सर्व क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले. ते शिवसेनेत कार्य करीत असताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असायचे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई म्हणाले. तर कोणतेही असे क्षेत्र नाही त्याला प्रधानांचा स्पर्श झालेला नाही. प्रधान हे ठाण्यातील नेतृत्वाचे शेवटचे तारे होते, असे मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. सतीश प्रधान यांच्या राजकीय क्षेत्रातील काही आठवणी माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT