मुंबई

अरुण सिंग यांच्या उपस्थितीत भाजपची संघटनात्मक बैठक

CD

विरार (बातमीदार) : भाजपमध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक बदल केले जातात आणि सहा वर्षांनी नवीन सदस्यत्व मोहीम राबवली जाते. या प्रक्रियेअंतर्गत गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात हे काम सुरू झाले आहे, मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे हे काम शिथिल झाले. २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर या कामाला गती देण्याच्या सूचना केंद्रीय नेतृत्वाने भाजप महाराष्ट्राला दिल्या आहेत. या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची या अभियानाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. या प्रक्रियेअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह नुकतेच वसई विरार येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या बैठकीला संबोधित करताना अरुण सिंह यांनी कोरोनाच्या काळातील आठवणी सांगताना सांगितले की, या महामारीमुळे देशात हाहाकार माजला होता, त्या वेळी इतर संघटनांचे कार्यकर्ते जीव वाचवण्यासाठी घरात बसले होते, तेव्हा भाजपचे कार्यकर्ते लढत होते. भाजपचे कार्यकर्ते जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करण्यात मग्न होते, अशा कार्यकर्त्यांमुळे नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि देशसेवेचे कार्य करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT