मुंबई

अंनिसने उलगडले चमत्कारामागील विज्ञान

CD

वाशी, ता. ७ (वार्ताहर) : नवी मुंबई जिल्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे तुर्भे येथील इंदिरा नगरात विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (ता. ६) पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि महिलांना चमत्कारामागील विज्ञान समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.
इंदिरा नगरमधील अंगणवाडी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विज्ञान प्रयोगांच्या माध्यमातून अनेक चमत्कारांचे रहस्य उलगडून दाखवण्यात आले. पाण्याने दिवा कसा पेटवता येतो, मंत्राने अग्नी पेटवणे, पेटता कापूर हातात धरणे, असे अनेक प्रयोग दाखवून त्यामागील विज्ञान पटवून देण्यात आले. या कार्यक्रमात ४० महिला व ५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांनी हे प्रयोग उत्सूकतेने पाहत असताना यामागील अनेक शंकाही विचारल्या. या सर्व शंकांची उत्तरे विज्ञान शिक्षक आणि महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते मनोहर तांडेल व ज्योती क्षीरसागर यांनी सोप्या शब्दांत दिली. हा कार्यक्रम सानपाडा शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक अंकुश व त्यांच्या पत्नी, टाटा पॉवर एनजीओच्या सुवर्णा भद्रे व ऐश्वर्या भद्रे यांच्या सहयोगातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र अंनिसचे नवी मुंबई जिल्हा प्रधान सचिव प्रा. अमोलकुमार वाघमारे, घणसोलीचे गजनंद जाधव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT