हेरॉईन विक्रीसाठी आलेला गजाआड
पावणेनऊ लाखांचा साठा जप्त
अंधेरी, ता. ७ (बातमीदार) ः हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एका ४५ वर्षांच्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी रविवारी (ता. ७) अटक केली. परवेझ आलम कासिम अन्सारी असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी पावणेनऊ लाखांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे.
आरोपीविरोधात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर काही आरोपींचे नाव समोर आले असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
बोरिवली परिसरात काहीजण हेरॉईनच्या डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली होती. शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील, प्रमोद निंबाळकर, पोलिस शिपाई फर्डे, भोई यांनी बोरिवलीतील जयवंत सावंत मार्ग, सुधीर फडके ब्रिजजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.
रविवारी रात्री उशिरा तिथे परवेज अन्सारी आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ८७ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत आठ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. परवेज हा मूळचा उत्तराखंडच्या हरिद्वारच्या मंगलोरचा रहिवासी आहे. सध्या तो नालासोपारा येथील ओसवाल नगरी ऐहम बार, जेसी शाळेजवळ राहतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.